Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सव व यात्रेबाबत नियोजन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री बालाजी महाराज वार्षिक उत्सव व यात्रा महोत्सव ची पूर्व तयारी बाबत आढावा बैठक नगर परिषदेच्या सभागृहात आज संपन्न झाली.उपविभागीय अधिकारी, प्रा.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा समितीची नियोजन सभा संपन्न झाली. या सभेला श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, मा. मुख्याधिकारी अरुण मोकळ, मा. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थानचे व्यवस्थापक श्री किशोर बिडकर, नायब तहसीलदार मुंढे, पोलीस उप निरीक्षक राठोड,महसूल विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभाग व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी सभेला हजर होते.

मान्यवरांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होऊन सभेला सुरुवात झाली. यात्रेमधील नियंत्रण कक्षासाठी पोलीस कर्मचारी नेमणे, सर्वे नंबर 98, यात्रेसाठी मोकळा व स्वच्छ करून देणे, उत्सव व यात्रेदरम्यान पार्किंगची ठिकाणे ठरवून दिशादर्शक नकाशा लावणे, आरोग्य कक्ष स्थापन करणे, विद्युत लोडशेडिंग न करणे, मोबाईल व स्थायी महिला तसेच पुरुष स्वच्छतागृहे, काकड आरती दरम्यान महिला पोलिसांची उपस्थिती, यात्रेमध्ये दामिनी पथक व पोलीस मित्र, यात्रेदरम्यान आठवडी बाजाराचे ठिकाण, गाढवांच्या बाजाराचे ठिकाण, यात्रेमधील जागावाटप, लोककला मंडळास परवानगी, यात्रेमधील दुकानांना रात्री 12:00 वाजेपर्यंत परवानगी, पालखी मिरवणुकीत श्रीजींचे दर्शन, लळिताच्या आदल्या दिवशी दारू विक्री बंदी या व इतर मुद्द्यांवर प्रशासन तसेच यात्रा समिती सदस्य यांच्यात चर्चा झाली. यापैकी बऱ्याच मुद्द्यांवर निर्णय झालेत व काही निर्णय नंतर कळवणार असल्याचे मा. उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.

राजे विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी बालाजी महाराज वार्षिक उत्सव बाबत आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली,व आजच्या सभेमध्ये ठरलेल्या विषयांबाबत आढावा घेण्यासाठी प्रशासन, श्री बालाजी संस्थान तसेच प्रत्येक समितीमधील यात्रा समिती सदस्य यांनी एक आठवड्यानंतर एकत्र येण्याबाबत सुचवले. मा. उपविभागीय अधिकारी हे स्वतः सर्व बाबींवर लक्ष ठेवणार असल्याचे, त्यांनी सांगितले. स्वच्छता व पाणीपुरवठा समिती, आरोग्य समिती, विद्युत पुरवठा समिती, शांतता व सुव्यवस्था समिती तसेच जागावाटप समिती, या समित्यांनी अनुक्रमे मा. मुख्याधिकारी, मा. वैद्यकीय अधीक्षक, मा. विद्युत अभियंता, मा. पोलीस निरीक्षक व मा. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित समितीमधील यात्रा समिती सदस्यांना बरोबर घेऊन कार्य करण्याचे ठरले. पत्रकार बंधू व भगिनी यात्रा उत्सवामध्ये प्रचार व प्रसाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतील, असे ठरले.

सभेचे सूत्रसंचालन सुरज गुप्ता यांनी केले व सभेच्या तयारीसाठी आशिष वैद्य, संस्थान कर्मचारी तसेच प्रशासनाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सभेनंतर मा. उपविभागीय अधिकारी तसेच राजे विजयसिंह जाधव, मा. मुख्याधिकारी व मा. तहसीलदार मॅडम यांनी आपापल्या टीम सोबत मंदिर परिसर, पालखी मार्ग व यात्रा परिसराची पाहणी करून चर्चा केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये