Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयाची कु.प्रगती शेंडे कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

विभागीय कुस्ती स्पर्धेत करणार जिल्ह्याचे नेतृत्व

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र् राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावलीची कु.प्रगती भास्कर शेंडे (वर्ग ११ विज्ञान) हिने ४३ किलो.वजन गटातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. सदर विद्यार्थिनी नागपूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करणार आहे.

जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या कू.प्रगती शेंडे हिचे संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार,सचिव राजाबाळ पाटील संगिडवार,शाळा समितीचे अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी, संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे,केंद्रप्रमुख जगन्नाथ वाढई ,मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,शारीरिक व क्रीडा शिक्षक युगंधर भोयर व सर्व समितीचे पदाधिकारी व शिक्षक वृंदानी अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये