ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घोडाझरि पर्यटन स्थळी जाण्याकरिता रस्ता नसल्याने,पर्यटकांचे हाल
नहर किनारी रस्ता धोकादायक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या घोडाझरि पर्यटन स्थळी जाण्याकरिता रस्ता नसल्याने नहर किनारी पाणी आणि रस्ता असल्याने अपघात रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.
घोडाझरि नहरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असताना काही पर्यटक आनंद घेण्यासाठी नहर किनारी जातात यामुळे अनेकदा अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत.पर्यटक यांना त्या ठिकाणची माहिती नसल्याने अनर्थ घडू शकते.यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने जाण्याकरिता रस्ता पक्का करावा जेणेकरून सदर रस्ता उपलब्ध नाही. यामुळे नहर किनारी जाणारा रस्ता हा तात्पुरता असल्याने अपघात रोखण्यासाठी उपाय करावे अशी मागणी केली जात आहे.