Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावाचन उपक्रम विजेते शिक्षक गोविंद पेदेवाड यांचा जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रम माहे ऑगस्ट 2024 पासून विनोबा ॲप शिक्षकांच्या सहकार्या करीता सुरू करण्यात आले असून या ॲप मध्ये शाळेतील विविध उपक्रम शिक्षकांना प्रदर्शित करण्याची संधी आहे.

       या ॲप चा वापर जिल्हा परिषद चंद्रपूर येथील शिक्षक प्रामुख्याने करताना दिसून येत आहेत.

ऑगस्ट 2024 मध्ये जिल्ह्यातील महावाचन उपक्रम संदर्भात 238 पोस्ट शिक्षकांनी विनोबा ॲप मध्ये प्रदर्शित केल्या असून त्यातील महावाचन उपक्रम उत्कृष्ट पोस्ट असणाऱ्या कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड या शिक्षकाची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

       याच सोबत मा. विवेक जॉन्सन सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान या उपक्रमातील विजेते 2 शिक्षक तथा विनोबा ॲप मध्ये उत्कृष्ठ केंद्र प्रमुख म्हणून चिमूर, कोर्धा, सास्ती येथील 3 केंद्रप्रमुख यांचा देखील सत्कार करण्यात आला

मा. अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. विशाल देशमुख उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर तथा मा.शुभांगी पिजदुरकर शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये