ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस व चिंचाळा सर्कलचा समावेश केल्यास परिसरातील गावांना मोठा फायदा होणार

घुग्घुस येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करा- विवेक बोढे 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : शहरात अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्या ही ५० हजारांच्या जवळपास आहे. महसूल विभागाच्या दृष्टीने घुग्घुस हे अतिशय महत्वाचे शहर आहे. काही वर्षे नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु पदाची कमतरता दाखवून तर कधी तांत्रिक अडचणीमुळे कार्यालयाला कायमस्वरूपी नायब तहसीलदार मिळू शकला नाही. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. घुग्घुस नायब तहसीलदार कार्यालयाच्या कामासाठी विद्यार्थ्यांना व नागरिकांना चंद्रपूर येथे जावे लागत आहे. चंद्रपूरच्या कार्यालयात गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

 घुग्घुस तहसीलमध्ये घुग्घुस सर्कल व चिंचाळा सर्कलचा समावेश केल्यास परिसरातील गावांना मोठा फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी निवेदनातून मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये