Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश विसर्जन दरम्यान नगरपालिकेने निभावले सामाजिक दायित्व

कृत्रिम गणेश विसर्जन तलाव आणि विसर्जन रथ यामध्ये केले नागरिकांनी श्री गणेशाचे विसर्जन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा नगरपरिषद चे प्रशासन सर्व जाती धर्मातील उत्साहांमध्ये सहभाग नोंदवून. सर्व धर्माप्रती असलेले सामाजिक दायित्व निभावत असल्यामुळे शहरातील नागरिकांमधून गणेशोत्सव दरम्यान केलेल्या व्यवस्थेबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक शहर वासी करताना दिसत आहे,याचाच प्रत्यय श्रीगणेश विसर्जन दरम्यान आला.

 विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेल्या देऊळगाव राजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे शहरात प्रति तिरुपती श्री बालाजी महाराजांचे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक येथे येत असतात. एकीकडे देऊळगाव राजा शहर हे विकासापासून कोसो दूर होते तीन वर्षांपूर्वी नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून अरुण मोकळ रुजू झाले . त्यांनी रुजू झाल्यानंतर कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेली विकास कामे हाती घेऊन शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले. त्यासोबतच शहरात सर्व जाती धर्मातील उत्सव दरम्यान नगरपालिका प्रशासन भाग घेऊन आपले प्रत्येक समाजाप्रती असलेले दायित्व पार पडताना दिसत आहे.

 श्री गणेश विसर्जन दरम्यान गेले 16 पथकांची निर्मिती

 देऊळगाव राजा शहरात गणेश विसर्जनादरम्यान प्रत्येक गणेश भक्ताला विसर्जनाची अडचण जाऊ नये यासाठी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी एकूण 16 पथकाची निर्मिती केली होती मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मार्गावरील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवणे, निर्माल्य कुंड ठेवणे, शहरातील विद्युत रोषणाई निरंतर चालू ठेवणे, मूर्ती संचालनासाठी रथ तयार करून शहरामध्ये मूर्ती संकलन करणे, विसर्जन विहिरीची स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता, विसर्जन करताना विहिरीच्या पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेवणे, शहरातील विविध मोकाट जनावरांची व्यवस्था करणे, जीव रक्षक दल कार्यान्वित करून, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे, मिरवणुकी दरम्यान स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरणाची व्यवस्था करणे. अशा प्रकारच्या विविध प्रकारची निर्मिती मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी करून गणेश विसर्जन सुस्थितीत होईल याकडे बारकाईने लक्ष ठेवले

 पालिकेच्या कृत्रिम कुंडामध्ये हजारो घरगुती मूर्तीचे विसर्जन

 शहरांमध्ये गणेश भक्तांना आपल्या घरातील मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी अडचण जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने ठीक ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले होते ,यामध्ये आदर्श कॉलनी येथील गणेश भक्तांनी त्यामध्ये 550 गणेश मूर्तीचे विसर्जन केले, स्थानिक बस स्थानकासमोर लावलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये 90 मूर्ती, महादेव मंदिर रोडवर 260 गणेश मूर्तीचे विसर्जन, सिव्हिल कॉलनी येथे 145 गणेश मूर्तीचे विसर्जन, अशा विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये एक हजाराच्या वर गणेश मूर्तीचे विसर्जन स्थानिक गणेश भक्तांनी केले. तर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठीआमना नदीच्या तीरावर दोन ठिकाणी पालिकेच्या विहिरीची व्यवस्था केली होती. त्यामध्ये शहरातील 30 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी विसर्जन केले

 पथकामध्ये मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख राजू जाधव कार्यालय अधीक्षक, श्रीकांत चिखले स्थापत्य अभियंता, एम.जे.शहा पर्यवेक्षक, संजय जाधव लेखापाल, संदेश तायडे लेखापरीक्षक, प्रल्हाद मुंडे, राजेंद्र वानखडे, सन्मती जैन, यांच्यासह पालिकेच्या 50 कर्मचाऱ्यांनी पथकामध्ये मध्ये श्री गणेश विसर्जन दरम्यान नेमून दिलेली कामे ही चोखपणे पार पाडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये