Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार टिकाराम म्हशाखेत्री यांचे वाढदिवसानिमित्त नोटबुक व पेनचे वाटप

मुलगी दवाखान्यात भर्ती असतांनाही राबविले सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील कवठी (गट ग्रामपंचायत) रुद्रापूर,सिंगापूर या गावातील सलग 5 वर्षापासून महात्मा गांधी गाव तंटामुक्ती अध्यक्ष असलेले तसेच पत्रकार असलेले कवठी येथील टिकाराम पुरुषोतम म्हशाखेत्री यांचे वाढदिवस निमित्त नोट बुक व पेनाचे वाटप

सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, ते नेहमीच लोकांच्या एका हाकेला पटकन धावून जातात, त्यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्त गावातील जि.प.शाळा, तथा शहिद सुरेश पाटील सुरकर विद्यालय येथे आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले, त्यांची 1 वर्षाची मुलगी खासगी दवाखान्यात 7 दिवसापासून भर्ती असूनही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली, व त्यांनी स्वतः हजर न राहता सुद्धा हॆ सामाजिक कार्य केल्याबदल त्यांचे शिक्षक वृंद, विध्यार्थी व गावातील नागरिकांनी कौतुक केले.

यावेळी गावच्या ग्रामपंचायत सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकर, सदस्य विलास बट्टे,पो.पा.सचिन शिडाम, शिवशाही क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बोरकुटे, जि.प.शाळा मुख्याध्यापक चौधरी व सर्व शिक्षक वृंद, श.सु.पा.सु. विद्यालय चे मुख्याध्यापक खोब्रागडे व शिक्षक वृंद, निश्चय तांगडे,आशिष घोटेकर, रोहित तांगडे,व शिवशाही क्रीडा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये