ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरपंच किशोर वरारकर नक्षत्र काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     श्रीक्षेत्र वढा चे सरपंच श्री. किशोर पाटील वरारकर नक्षत्र काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क सभागृहात आयोजित नक्षत्रांच देणं काव्यमंच च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात सदर सन्मान ज्येष्ठ साहित्यिक कवी नारायण सुमंत (सोलापूर), श्रीकांत चौगुले, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, वादळकार कवी प्रा. राजेंद्र सोनवणे, प्रसिद्ध उद्योजक शिवहर मरे यांच्या उपस्थितीत श्री. वरारकर यांना प्रदान करण्यात आला.

  सरपंच किशोर वरारकर यांनी ग्रामविकासाच्या कार्यासोबतच अनेक भक्ती गीतांचे लेखन केले आहे. विविध विषयांवरच्या कविता, पोवाडा,भजन लेखन करून सादरीकरण अनेक ठिकाणी केलेले आहे.

     पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये