ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कीम लागल्याची बतावणी केली

अडीच लाखाचे दागिने घेऊन पोबारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील विठाई नगर भागात राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन तुम्हाला स्कीम लागली आहे ,घरातील दागिने दाखवा अशी बतावणी करून सदर महिले जवळील दोन लाख 44 हजार 750 रुपयांचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी शहरात घडली,याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की शहरातील विठ्ठल नगर भागात राहणाऱ्या महिला निर्मला रमेश काबुकडे यांच्या घरी एक अनोळखी इसम आला त्याने तुम्हाला स्कीम लागली आहे असे बतावणी करून घरातील दागिने दाखवण्यास सांगून ते पाहून घेऊन फिर्यादीस गाडीवर घेऊन जाऊन शहरातील सातेफळ रोडवर नेऊन सोडून दिले सदर महिलेच्या दागिनेमध्ये एक सोन्याचा नेकलेस 9 ग्रॅम किंमत 45 हजार, सोन्याचे झुंबर 10 ग्रॅम किंमत 50 हजार, सोन्याचे कानातील वेल 5g किंमत 25000 सोन्याची पोत किंमत पंचवीस हजार देव्हाऱ्यातील सोन्याच्या गणपती मूर्ती आणि इतर दागिने एकूण किंमत दोन लाख 44 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल सदर भामट्याने लंपास केला,महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव मोगल करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये