ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यात अव्वल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

         पंचायत समिती देऊळगाव राजा च्या वतीने तालुकास्तरीय शिक्षण परिषद कार्यक्रमाचे आयोजन २१ सप्टेंबर ला करण्यात आले.

या कार्यक्रमात “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” खाजगी व्यवस्थापण शाळेच्या गटातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ला मिळाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संजय खडसे गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले डायटचे प्राचार्य  जगराम भटकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ कोल्हे,पर्यवेक्षक दिलीप जाधव व शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शांतीलालजी सिंगलकर, कोषाध्यक्ष श्री ओप्रकाशजी धननावत, सचिव सुबोधजी मिश्रीकोटकर, संचालक मंडळ,सदस्य यांनी अभिनंदन केले आहे,तसेच विविध स्तरातून सर्वांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये