Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 वडीगोद्री येथे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाच्या विरोधात उपोषणास बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे व ॲडवोकेट मंगेश ससाणे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीने देऊळगावराजा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या बंदसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केल्याबद्दल त्यांचे ओबीसी समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

आजच्या शहरबंद आंदोलनामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी बस स्टॅन्ड चौकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकासमोर एकच पर्व ओबीसी सर्व, जय ज्योती जय क्रांती, तसेच लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन बंदचे आंदोलन यशस्वी केले. बंदच्या काळामध्ये पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

    यामध्ये गोविंदराव झोरे, अमोल काकड, प्रकाश खांडेभराड सर, गणेश डोके, अजय शिवरकर, एकनाथ सोनवणे , दीपक कायंदे, देवानंद कुटे, एडवोकेट राजू मांटे, दीपक मिसाळ, सचिन मुंडे, विजय कासारे, सुनील झोरे, सचिन वाघमारे, एडवोकेट किशोर सरदार, अरविंद खांडेभराड, योगेश खारडे, शरद खरात, भीमराव चाटे, दयासिंग बावरे, राजू मांटे सर, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, रवी इंगळे, भारत तायडे, प्रभाकर खांडेभराड, मंगेश तिडके, सुरज गुप्ता, प्रदीप वाघ, मुशीर कोटकर, सदानंद तिडके, अभय वाघ, सखाराम खांडेभराड, भरत तायडे आदींनी सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये