Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांची वसंतराव नाईक परसबागेला भेट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नागपूरच्या मनीष नगरमध्ये श्रीपत राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हरितक्रांतीचे प्रणेते आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहून क्रांतीकारी कार्य केलेल्या वसंतरावजी नाईक यांच्या नावाने जमिनीपासून पन्नास फूट उंचीवर सिमेंटच्या जंगलात यशस्वी आणि आरोग्यदायी सेंद्रिय परसबाग तयार केली आहे.

आजपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी परसबागेला भेट देऊन कौतुक केले आहे. पारशिवनी जिल्हा नागपूर,पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या पुढाकाराने मा.उध्दव साबळे, सरचिटणिस,रोजगार संघ,नागपूर यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी, वसंत वऱ्हाडे हे देखिल उपस्थित होते. दीपाली व अंजली श्रीपत राठोड इयत्ता नववी आणि दहावीत शिकत असून यांचे ” परसबाग असावी दारी.,,या विषयांवरील सादरी करण ऐकून सर्वजन मंत्रमुग्ध झाले. उपायुक्त कमलकिशोर फुटाने यांनी दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांच्या उज्वल भविष्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले व भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी श्रीपत राठोड यांच्या परिवारांकडून पर्यावरणपूरक संदेशाने भरलेले ” परसबाग असावी दारी.,, हे स्वनिर्मित शुभेच्छापत्र देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता जयश्री राठोड यांच्या ‘परसबाग निर्माण गीत, व श्रीपत राठोड यांच्या ‘फुलो की बस्ती, या स्वलिखीत कवितेने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये