Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विमुक्त भटके आदिवासी संयोजन समिती, वर्धा 

डॉ.अभ्युदय मेघे यांनी केले संवाद यात्रेचे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विमुक भटके आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र” संघटने द्वारा ७४ व्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य व्यापी ‘विमुक्त भटके आदिवासी संवाद यात्रा’ काढण्यात आली आहे. दिनांक २८ ऑगस्ट २०२४ ला महात्मा जोतिबा फुले वाडा, समता भूमी पुणे येथून या यात्रेची घोषणा करण्यात आली व ३१ ऑगस्ट २०२४ पासून सोलापुर जिल्ह्यातील सेटलमेंट या ठिकाणाहून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. २० जिल्हे, ३० तालुके आणि ३००० किलोमीटर ही यात्रा पार करत २३ सप्टेंबर २०२४ सरळ मुंबईला मंत्रालायमध्ये धडकणार आहे.

      महाराष्ट्र व्यापी संवाद यात्रा या दरम्यान दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ला वर्धा जिल्ह्यात पोहचली. वर्धा जिल्ह्यातील जुना पुलगाव मदारी वस्तीवर या यात्रेचे स्वागत करण्यात आले. जुना पुलगाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नगर परिषद पुलगाव येथे संवाद रॅली काढण्यात आली. तर पुलगाव वरून आगरगाव येथील पारधी समूहाला संवाद भेट देत देवळीला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहचली. देवळी येथे भोईसमूहाच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि थेट देवळी ते बजाज चौक येथे ही यात्रा संवाद मोर्चा करीता पोहचली.

        बजाज चौक मध्ये एक वर्धा जिल्ह्यातील माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था, गंगाई बहुउद्देशीय संस्था, आदिवासी फासे पारधी संस्था, महर्षी वाल्मिकी ऋषी संस्था, मुस्लिम मदारी समाज विकास संस्था या संस्थांच्या संपर्कात असणारा मदारी समूह, आदिवासी कोरकू समूह, पारधी समूह, भोई समूह, बेलदार समूह, वढार समूह, बंजारा समूह, नाथ जोगी समूह, गोसावी समूह इत्यादी समूहांनी बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बजाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा दीड-दोन किलोमीटर मोर्चा या समूहांनी काढून अपर जिल्हाधिकारी, वर्धा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वर्धा जिल्यामध्ये ही यात्रा येतांना पाहून पुलगाव, देवळी आणि वर्धा येथील प्रस्थापित राजकीय पक्षांना या यात्रेने आकर्षित केल्याचे चित्र यात्रेदरम्यान दिसून आले. वर्ध्याचे—- ——-राजकीय यांच्या द्वारा “संवाद यात्रेचे” यात्रेचे जाहीर स्वागत केले व प्रशंसा ही केली, भटक्यांच्या प्रश्नांची दखल जो पर्यंत घेतली जाणार नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम पणे उभे आहोत, असे आश्वासन ही दिले.

      विमुक्त भटक्या, आदिवासी समूहाची अवस्था स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर अजून ही दयनीय आहे. गेल्या ७७ वर्षांमध्ये विविध राजकीय पक्षांनी या देशावर सत्ता गाजवली आहे मात्र हा समुह जणू माणूस आहेच नाहीत या प्रमाणे सरकार या कडे बगत आले आहे. या समूहाच्या मताच्या जोरावर कित्येक पक्ष प्रस्तापित झाले मात्र हा समूह अजून वेशीच्याच बाहेर आहे. अज्ञान, मागासलेपण आणि बेकारीच्या कळा सोसत कसे तरी आपला उदरनिर्वाह हा समूह करतो आहे. आपल्याला आता कुणी वाली उरलेला नाही, आपला विकास कोणताही राजकीय पक्ष करणार नाही आणि जो येईल तो आपला वापर करून जाईल याची तीव्र भावना मनात घेऊन या समूहाने ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व उभे झाले पाहिजे म्हणून विमुक्त भटके आदिवासी संवाद यात्रेच्या नावाने हा लढा उभा केलेला आहे. या संवाद यात्रेची गरज आणि या यात्रेने हाती घेतलेले मुद्दे हे मात्र वर्धा जिल्यातील राजकीय पक्ष्यांच्या आकर्षणाचे कारण बनल्याचे चित्र काल या संवाद यात्रेमध्ये दिसून आले. विमुक भटके आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्रचे प्रमुख व प्रतिनिधी ऍड. अरुण जाधव, मुमताज शेख, बाबूशिंग पवार, मुनिर भाई, संतोष पवार, ललिता धनवटे, भावना वाघमारे, सुनील अहिरे इत्यादी प्रवक्त्यांची उपस्थिती होती. या यात्रेचे वर्धा जिल्यामध्ये नियोजन करणारे, जिल्हा संयोजन समिती चे समन्वक विजय पचारे, प्रकाशजी बमनोटे, मंगलाजी लोखंडे, सोनालीताई कोपुलवार, राजेंद्रजी कळसाईत, अचीन पवार, किरण पारिसे, शाहरुख अली, सय्यदजी अली, आकाश हातगाडे, कोरो इंडिया चे कार्यकर्ते, प्रमोद वालदे, दीपक मरघडे, राणी येडस्कर, अनिता धुर्वे यांनी या संवाद यात्रेचे वर्धा जिल्ह्यात आयोजन केले.

         वर्धा जिल्ह्यातील संवाद यात्रेचा समारोप करताना, आदिवासी कोरकू समूहांनी घरकुलाचा प्रश्न उपस्थित केला, मदारी समूहाने घरपट्टे आणि वोटिंग कार्डचा प्रश्न उपस्थित केला, पारधी समूहाने जातीचे प्रमाणपत्र तर भोई समूहाने यशवंतराव चव्हाण योजनेतील घरकुल योजनेचा प्रश्न उपस्थित केला. बेलदार, वडार, धनगर, इत्यादी समूहाने आप आपल्या समस्या मांडल्या. विमुक भटक्या समूहाचे संविधानाक अधिकार, समता, समानता आणि प्रतिष्ठा इत्यादीबाबींचा ही उल्लेख केला. जिल्ह्यातील संवाद यात्रेच्या सरोपिय भाषणामध्ये कराळे मास्टर, सुधीर भाऊ पांगुळ, ऍड. अश्विनी गायकवाड यांनी सुद्धा न संवाद यात्रेच्या भूमिकेशी सुसंगत मत व्यक्त केले.

       गेल्या ३१ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू करून यात्रेमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महाराष्ट्र संयोजन समितीच्या प्रमुख मुमताज शेख यांनी तमाम विमुक्त भटक्या आदिवासी बांधवांना यावेळी यात्रे विषयी आवाहन ही केले की, येत्या २३ सप्टेंबर २०२४ राज्याच्या राजधानीत मुंबई मध्ये आपल्याला थेट मंत्रालय गाठायचे आहे, तेव्हा मोठ्या संख्येने आपल्या समाज बांधवाने सहभागी व्हावे असे आवाहन केलं.

        संवाद यात्रेच प्रमुख नेतृत्व करणारे आणि विमुक भटके आदिवासी संयोजन समितीचे प्रमुख ऍड. अरुण जाधव यांनी संवाद यात्रेचा उद्देश आणि आपली भूमिका विशद केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही या देशशातून इंग्रजांना हाकलून लावले, स्वातंत्र्याच्या अगोदर आमच्या बापानं, आमच्या आज्या-पंजोबांन इंग्रजांबरोबर लढा दिला असा इतिहास असतांना तुम्ही आम्हाला गुन्हेगार म्हणून संबोधता. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही आम्हाला काय दिलं ? अहो! सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय वो, सांगा धनाचा साठा नी अमुचा वाटा कुठं हाय वो ! असे म्हणत संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करणारा, मदारी, महार, बेलदार, भोई, पारधी, बहुरूपी, मांगगारोडी, सरोदी, गोसावी, गोंधळी, नाथजोगी, गवळी, वडार, धनगर, वंजारी, लोहार, बंजारा व आदिवासी इत्यादी विविध जात समूहाचा महाराष्ट्रातील लढवय्या पठ्याला तुम्ही कसलं जातीच प्रमाणपत्र मागता. भटक्या पारधी-मदारी यांच्या साध्या तुम्ही जन्माच्या नोंदी ठेवल्या नाहीत आपल्या रेकॉर्डला! आणि म्हणून आमची मागणी आहे, आम्हाला स्वतंत्र मंत्रालय व मंत्रालयाचा कायदा हवा आहे. विमुक्त भटक्या समूहाच्या लोकांना आहे त्या ठिकाणी मियमाकुल करावे. घरकुल योजने साठी घर पट्टे देण्यात यावे. आणि जन्माचे दाखले, जातीचे दाखले, तात्काळ गृह चौकशीच्या आधारे देण्यात यावे. अश्या मागण्या घेऊन आम्ही उद्याला मांत्रालय जाणार आहोत. उद्या जर तुम्ही याच्यात दिरंगाई केली तर हा भटका समूह उद्या सरकारी कार्यालय आणि मंत्रालयात खरोकरीच्या सर्पाचा मदारी खेळ दाखवल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा यावेळी राज्यकर्त्यांना देण्यात आला.

        समारोपीय कार्यक्रमाचे संचालन माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेचे संस्था प्रमुख विजय पचारे यांनी केले तर आभार गंगाई संस्थेच्या मंगलाताई लोखंडे यांनी मानले. आदिवासी कोरकू, मदारी, पारधी, भोई, बेलदार, मांगगारुडी, बहुरूपी, सरोदी, गोसावी, गोंधळी, नाथजोगी, गवळी, वडार, धनगर, वंजारी लोहार बंजारा व इतर भटक्या समूहाच्या लोकांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी परिश्रम घेतले. तर राष्ट्रीय विद्यार्थी परिषद, वर्धा. सावित्रीच्या लेकी संघटना वर्धा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, शाळा वर्धा. इत्यादी संघटनांनी सदर संवाद यात्रेच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शविलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये