Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट्सची चमकदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 अमरावती येथे ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चे संयुक्त राष्ट्रीय शिबिर (कॅम्प) संपन्न झाले.

यादरम्यान श्री व्यंकटेश महाविद्यालयातील १५ कॅडेट आणि एनसीसी अधिकारी लेफ्टनेंट डॉ. महेश तांदळे यांच्यासह अमरावती विभागातील एकूण ४०० एनसीसी कॅडेटस सहभागी झाले होते. पूर्ण १० दिवसामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये फायरींग कॉम्पिटिशन, ड्रिल कॉम्पिटिशन, मॅप रीडिंग कॉम्पिटिशन, क्विझ कॉम्पिटिशन, ग्रुप डान्स, ग्रुप साँग, सोलो डान्स, लेक्चर कॉम्पिटिशन, अशा विविध स्पर्धा पार पडल्या.

यामध्ये महाविद्यालयातील एन सी सी कॅडेट यांनी सहभाग घेऊन पारितोषिक मिळवले. यामध्ये सीनिअर अंडर ऑफिसर शुद्धोधन खरात, ज्युनिअर अंडर ऑफिसर बालाजी जाधव यांनी ड्रिल कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेऊन प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. कॅडेट भीमराव साबळे याने लेक्चर कॉम्पिटिशन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कॅडेट अक्षय कव्हळे याने कला प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला तसेच ज्युनिअर अंडर ऑफिसर सुशीला ठाकूर हिने बेस्ट ड्रिल प्रथम क्रमांक, बेस्ट सीनिअर, लेक्चर कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक, क्विझ कॉम्पिटिशन द्वितीय क्रमांक आणि कॅडेट साक्षी कुरंगळ हिने क्विझ कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक आणि सूत्रसंचालन मध्ये पारितोषिक पटकावले.

सदर शिबिर हे १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगावचे कमांडींग ऑफिसर कर्नल व्योमेश शुक्ला तसेच सुभेदार मेजर कमल सिंग आणि ट्रेनिंग जेसीओ सुभेदार सचिन बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या यशाचे श्रेय विजेते कॅडेट कर्तव्यदक्ष एनसीसी अधिकारी लेफ्टनेंट डॉ. महेश तांदळे यांना देतात. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये