Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईद -ए -मिलादुन्नबीच्या शुभ मुहूर्तावर रैलीचे भव्य स्वागत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – शहरातील टेकडी विभाग संघमित्र चौक येथे ईद चा शुभमुहूर्तावर रैली चे आयोजन करण्यात आले रैली मध्ये हजारो ची संख्या मध्ये नागरिक उपस्थित होते. रैलीत उपस्थित असणाऱ्यांना फळ, बिस्कुट, पाणी, मसाला भात वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात काँग्रेस चे माजी नगराध्यक्षघनश्याम मुलचंदानी, काँग्रेस चे शहर अध्यक्ष शेख करीम, काँग्रेस महिला अध्यक्ष ऍड मेघा भाले, अफसाना सैय्यद, प्रीतम पाटील, आरिफ सिद्दीकी, शेख बशीर, शाबीर कुरेशी, शकील शेख, शेख इस्त्रायल, अजहर शेख, किशोर हरडे, प्रांजल बालपांडे, रशीद कुरेशी, प्रानेश अमराज, रियाज बाजी, आशाबाई जवादे सोबतच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रेली शिस्तबध पद्धतीने काढण्यात आली शहरातील असंख्य मुस्लिम बांधव रेलीत हजर होते. रेलीत डीजे -ढोल ताशे होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये