अल्ट्राटेक आवालपूर उच्चभ्रू अधिकारी वसाहतीत एकाच रात्री दोन घरात करोड रुपयाची चोरी
नवनियुक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांच्या घरातील लाखोचा ऐवज लंपास

चांदा ब्लास्ट
हात हातामध्ये हत्यारे घेऊन चार संशयित कॅमेऱ्यामध्ये कैद
40 तोडे सोने व तीन किलो चांदी चोरीला गेल्यांचे घरमालकांचे म्हणणे
नांदा फाटा प्रतिनिधी! कोरपणा तालुक्यातील औद्योगिक परिसर असलेल्या अल्ट्राटेक आवरपुर अल्ट्राटेक माणिक गड गडचांदूर अंबुजा सिमेंट उपरवाही या परिसरात मागील एक ते दीड वर्षापासून धाडसी चोऱ्यांचे सत्र सारखे सुरू असल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे अल्ट्राटेक सिमेंट आवर पुढच्या परिसरात सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या येथील अधिकारी वर्गांच्या वसाहतीमध्ये एकाच रात्री दोन घर फोड्या झाल्यामुळे व्यवस्थापनाची झोप उडाली असून मध्यरात्री तलवार सदृश्य शस्त्र हातात घेऊन चार चोरटे परिसरात फिरत असल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेले आहे.
चोरांनी दोन घरातून घरमालकांच्या म्हणण्यानुसार 40 तोळे सोने व तीन किलोच्या जवळपास चांदी चोरीला गेल्याचे म्हणणे आहे ज्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि गडचांदूर पोलीस प्रशासनामध्ये खडबड माजलेली असून आठ ते दहा दिवसांपूर्वी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूर येथे एकाच रात्री पाच वसाहती फोडण्यात येऊन चाळीस ते पन्नास लाखाचा ऐवज लंपास केल्या गेला अगोदर अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथे पाच ते सहा वसाहती फोडण्यात येऊन लाखो रुपयाचा ऐवजी चोरीला गेला मागील आठ ते दहा महिन्यापूर्वी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवर्पुर येथे सुद्धा अशाच प्रकारची धाडसी चोरी पाच ते सहा वसाहतीमध्ये झाली यामध्ये 15 ते 20 लाखाचा ऐवजी चोरीला गेला.
मात्र नुकत्याच झालेल्या चोरीमुळे शासनाची झोप उडाली असून प्राप्त माहितीनुसार काही महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या अल्ट्राटेकडील अधिकारी राजेंद्र पारीख यांनी आपल्या पत्नीला वैद्यकीय उपचाराकरिता कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेली वसाहत रिकामी करण्याकरिता अवधी मागितला प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना गुजरात अहमदाबाद येथे अचानक जावे लागले ज्यामुळे घरातील किमती मौल्यवान सोन्या चांदीचे दाग दागिने करून या कुत्र्याची जबाबदारी नौकर गड्यावर सोपवीत उपचारार्थ रवाना झाले मात्र सकाळी नौकर गळ्याच्या म्हणण्यानुसार अस्ताव्यस्त पडलेले साहित्य व तुटलेला दरवाजा बगदा चोरीचा अंदाज लावण्यात आला राजेंद्र पारिख यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरात भविष्यात असणाऱ्या लग्नकार्यासाठी जवळपास 30 ते 32 तोडे सोन्याचे दागिने याशिवाय दोन ते अडीच किलो चांदीचे शिक्के पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची समजते याच परिसरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिनस्त असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवरपुर शाखेमध्ये नव्यानेच महिन्याभरापूर्वी रुजू झालेले मॅनेजर शाहिद मुबारक हुसेन हे लागून आलेल्या चार दिवसाच्या सुट्ट्यामुळे दिनांक 17 रोजी आपल्या परिवारासहित गोवा येथून पर्यटन करून आले असता मुख्य दरवाजावर लावलेली कुंडी तुटलेली त्यांना दिसताच व घरात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य बघता त्यांच्या घरातून दहा तोडे सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे समजते
सदरच्या दोन्ही घटना कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उच्चभ्रू वसाहतीत घडल्यामुळे कंपनी प्रशासनाच्या सुरक्षा प्रणालीवर खंबीर प्रश्न उभे झाले आहे या परिसरात कायमची सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा अशा धाडसी चोऱ्या होत असल्याकारणाने कंपनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सदर घटनेची माहिती कडचांदूर पोलिसांना देण्यात आली असून शाहिद हुसेन यांच्या तक्रारीनुसार न्याय दंड संहिता 2023 कलम 305 ए 331 चार अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली गट चांदीचे थानेदार शिवाजी कदम हे करीत असून अल्ट्राटेक इथे झालेल्या चोरीच्या परिसरात सुहानपथक फिंगरप्रिंट एक्सपर्ट पथक यांना प्राचार्य करण्यात आले होते याशिवाय मिळालेले सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस प्रशासनाकडे असलेले ठोस पुरावे असल्यामुळे लवकर चोरांना पकडण्याचा विश्वास ठाणेदारांनी व्यक्त करून दाखवला मात्र सदरची घटना ही फार मोठी असल्यामुळे आता जिल्हा पोलीस प्रशासन या घटनेकडे कोणत्या दृष्टीने बघते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे