Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भस्तरीय कराटे स्पर्धेत भद्रावतीतील खेळाडूंचे सुयश

सात सुवर्णपदके तथा तीन रजतपदके प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

       चंद्रपूर येथील लालपेठ येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय कुंग फु कराटे स्पर्धेत भद्रावती येथील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या खेळाडूंनी आपला नेत्रदीपक खेळ सादर करीत सात सुवर्णपदके तथा तीन रजत प्रत्येक पदके प्राप्त केली आहे.

सदर स्पर्धेत विदर्भातील जवळपास दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत मुलींच्या गटात साची चावरे हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके, सोनाक्षी कोंडस्कर हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके तर साक्षी कपाट हिने काता व फाइट प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली.

तर मुलांच्या गटात नैताकी बनपुरकर याने काता व फाइट प्रकारात एक सुवर्णपदक व एक रजत पदक तर शोर्धाज राय यांने काटा व फाइट प्रकारात दोन रजतपदके प्राप्त केले आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शितल तेलंग, राकेश दीप, संदीप चावरे, दामिनी सूर्यवंशी व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. यशस्वी खेळाडूंचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये