Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध

शिवसेना जिल्हा प्रमुख बंडु हजारे व तालुका प्रमुख खुशाल सूर्यवंशी ह्यांच्या नेतृत्वात केले आंदोलन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी ह्यांनी विदेशी भूमीत जाऊन आरक्षण विरोधी वक्तव्य करून मागास समाजाबद्दल काँग्रेस पक्ष किती असंवेदनशील आहे हे सिध्द केले असुन शिवसेना ह्या वक्तव्याचा व खा. राहुल गांधी ह्यांचा करीत असल्याचे निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष बंडु हजारे ह्यांनी सांगितले.

राजुरा येथे डॉ. आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शिवसेना जिल्हा बंडु हजारे व तालुका प्रमुख खुशाल सूर्यवंशी ह्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले जिवती तालुका प्रमूख भारत बिराजदार, राजुरा शहर प्रमुख नितेश सिडाम, कपिल राठोड ह्यांचेसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये