ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विमुक्तितृप्त जेष्ठ पूर्णिमा समुत्कर्षी समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट

बुध्द धम्माचा स्वतंत्र सांस्कृतीक इतिहास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी तथागत बुध्दाच्या जीवनातील महत्त्ववाच्या ऐतिहासिक घटनांचे तथा प्रसंगाचे अवलोकन करून बौध्द सणांची निर्मिती करून ती भारतीय समाज व्यवस्थेमध्ये रुजविण्यासाठी धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समिती दुर्गापूरच्या विद्यमाने बौध्द सभ्यता रुजवण संवर्धन व अभिवृध्दी अभियान क्रियान्वित करण्यात आले आहे. कारण बुध्दाच्या जीवनातील विचारांच तत्वज्ञानाच प्रासंगीक रुपांतरण बौध्द सणांच्या माध्यमातून ते समाजामध्ये प्रतिबिंबीत होत असते आणि बौध्दांच्या स्वतंत्र सभ्यता निर्मितीसाठी आजे ते करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. असे नुकत्याच दुर्गापूर येथे पार पडलेल्या विमुक्तितृप्त जेष्ठ पूर्णिमा समुत्कर्षी समारंभाच्या प्रास्ताविक प्रबोधनात अगारिका आक्रिता बोरकर यांनी प्रतिपादित केले.
विमुक्तितृपत पूर्णिमा समारंभात धम्म प्रशिक्षिका संगीता मानकर यांनी संबोधी प्राप्तीनंतर बुध्दजीवनातील विमुक्तिसुखाची अविस्मरणियता या नाविण्यपूर्ण विषयावर तथा धम्म प्रशिक्षिका पोर्णिमा साखरे यांनी धम्म प्रबंधाच्या आराखडयाची यशस्वी गाथा म्हणजे जेष्ठ पूर्णिमा! या अभिनव विषयावरील प्रबोधनाने श्रावकांचा समुत्कर्ष साधला. त्याच प्रमाणे कुमारी जीविका बोरकरचे कथाकथनछाया नंदुरकर यांची कबीरवाणी आणि संगीतकार संघपाल मुंढे यांचे संचलनात छाया वालदेकविता नळेकु. रीया साखरेअस्मिता वानखेडे व मीना वालदे या टीमने बुध्दगीतांची कर्णमधूर प्रस्तूती ही विशेषताच ठरली. शेवटी समारंभाचे उदघाटक अतिथि मा. वितेश बांबोळेब्रम्हपूरी यांनी तथा राजेंद्र खांडेकर यांनी आपले विचार व्यक्त केलेत.
शेवटी आशयकुमार वानखेडे कडून या मंगल प्रसंगी समारंभातील धम्मसावकांना खीर दाण करून मन संपृक्त केले. अनिल वानखेडे यांचे विशेष अभिनंदनाने समारंभाची सांगता झाली. असे धम्म प्रसार समितीचे प्रवक्ता नरेंद्र रामटेके कळवितात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये