गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या देशी – विदेशी दारूची वाहतूक करतांना आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चारही आरोपींवर गुन्हा नोंद ; एकूण 6 लाख 73 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. ११ जून रोजी अल्लीपूर वडनेर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या मुखबीर चे खबरे वरून पंच व पो. स्टाफ सह शिरसगाव चौक येथे नाकाबंदी केली असता नमूद कार मधील इसमानी वाहन न थांबवता वडनेर कडे निघाले त्यांचा पाठलाग करून मौजा सोनेगाव राऊत येथे त्यांना थांबविले असता आरोपी सुरेश वरघणे (पसार), दर्शन इटणकर (पसार) रा. अल्लीपूर. हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आरोपी सौरव रमेश सुरकार, वय 26 वर्ष, यास पकडले त्याचे ताब्यातील कारची तपासणी केली असता, कार मध्ये 19 खर्ड्याच्या खोक्यामध्ये प्रिमियम डिलक्स कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 180 ml च्या एकूण 912 सीलबंद शिशा किं.1,36,800 /- रु. 2 खर्ड्याच्या खोक्यामध्ये विदेशी दारूने भरलेल्या ऑफिसर चॉईस कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 90 सीलबंद शिशा किं. 27,000/- रु. 1 खर्ड्याच्या खोक्यामध्ये टॅंगो देशी दारू ने भरलेल्या 90 ml च्या सिलबंद 100 शिशा किं. 10,000/- रु. एक मारोती सुझुकी स्विफ्ट कार क्र. MH-29/AD/5535 किं.5,00,000/- रु. असा एकूण जु. किं. 6,73,800/- रु. चा माल देशी – विदेशी दारूचा माल अवैधरित्या बाळगून त्याची वाहतूक करतांना मिळून आल्याने पंचासमक्ष मोक्यावरून कार सह जु.किं. 6,73,800/- रु.चा माल जप्त केला. सदर दारुमाल आरोपी अंकित सेठ रा. विठाळा बारमालक. (पसार) याचे कडून विकत घेतल्याचे आरोपी सौरव रमेश सुरकार वय २६ वर्ष ने सांगितले वरून नमूद चारही आरोपींविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे सर, पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड सर यांचे मार्गदर्शनात
पोउपनि. अमोल लगड, हमीद शेख, श्रीकांत खडसे, मनीष कांबळे, प्रदीप वाघ,स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पार पडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये