Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश मंडपात झालेल्या त्या चाकू हल्ल्यातील जखमी इसमाचा मृत्यू

फरार आरोपी गजाआड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 श्री गणेशाची आरती करण्याच्या वादावर दिनांक 10 ला शहरातील शिवाजीनगर भागात गणेश मंडपात वाद झाला,या वादामध्ये घटनेतील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या भावावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले त्याचवेळी एकूण चार आरोपी विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीच्या शोधात असतानाच काल गंभीर जखमी असलेल्या बाळू उर्फ परमेश्वर दत्तात्रय पवार यांचा संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला ,त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला, घटनेच्या दिवसापासून पोलीस पथक आरोपींच्या शोधात होते त्यापैकी दोन आरोपी यांना यापूर्वीच पोलीस प्रशासनाने अटक केली होती, त्यातील मुख्य आरोपी आज देऊळगाव राजा येथे अटक केली आहे

 सविस्तर वृत्त असे की रामेश्वर दत्तात्रय पवार वय 44 वर्ष यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरून घटनेतील आरोपी आणि फिर्यादी राहत असलेल्या शहरातील शिवाजीनगर भागात सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे.

यामध्ये दिनांक 10 ला संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान श्री गणेशाची आरती करण्याच्या कारणावरून आरोपी नामे अंकुश हरिभाऊ घोंगे वय 35 वर्ष , सौ कविता अंकुश घोंगे वय 32 वर्ष , शिवाजी विठ्ठल घोंगे वय 63 वर्ष यांनी घटनेतील मृतक बाळू उर्फ परमेश्वर दत्तात्रय पवार यास जबर मारहाण केली मृतकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने घटनेतील आरोपी नामे अंकुश हरिभाऊ घोंगे याने त्याच्या खिशातील चाकू काढून बाळू उर्फ परमेश्वर पवार यास गंभीर जखमी केले नातेवाईकांनी त्याला ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे उपचारासाठी आणले असता पुढील उपचारासाठी त्यांला छत्रपती संभाजी नगर येथे दाखल केले, घटनेची फिर्याद मृतकाचा भाऊ रामेश्वर दत्तात्रय पवार यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली त्यावरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून पोलीस पथक त्यांचा शोध घेत होते चाकू हल्ला झालेल्या गंभीर जखमी चा मृत्यू काल झाल्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकू हल्ल्यानंतर दिनांक 11 पासून पोलीस पथक त्यांच्या आरोपीच्या शोधात होते त्यावेळी त्यांनी शिवाजी विठ्ठल घोंगे वय 63 वर्ष व सौ कविता अंकुश घोंगे वय 32 वर्ष राहणार शिवाजीनगर देऊळगाव राजा यांना अटक केली आहे तर घटनेतील फरार आरोपी दिनांक 14 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सिंदखेड राजा देऊळगाव राजा रोडवरील जिनिंग जवळ असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाले त्यावरून त्यांनी मुख्य आरोपीला अटक केली. संपूर्ण घटनाक्रम पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेवरून कार्यवाहीचे चक्र हलविले उपविभागीय पोलीसअधिकारी मनीषा कदम. तसेच पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, समाधान बंगाळे, माधव कुटे, सय्यद मुसा आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये