Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा जालना रोडवर भीषण अपघात 

दुचाकीस्वार जागीच ठार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 ग्रामीण भागातून देऊळगाव राजाकडे औषधी नेण्यासाठी येत असताना पाठीमागून येणाऱ्या चार चाकी वाहनाने देऊळगाव राजा जालना रोडवरील हॉटेल चैत्रबन धाब्याजवळ दुचाकी ला जोरात धडक दिले यामध्ये दुचाकी स्वार गंभीर झाला त्याला अधिक उपचारासाठी देऊळगावराजा येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 सविस्तर वृत्त असे की फिर्यादी शिवलाल लक्ष्मण घडलिंग वय 27 वर्ष राहणार वरखेड पोस्ट वाघरूळ तालुका जिल्हा जालना यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ नामे मृतक शांतीलाल लक्ष्मण घडलिंग दुचाकी क्रमांक एम एच 21 एके 31 76 त्यांचे गाव वरखेड येथून देऊळगाव राजा येथे औषधी आणण्याकरता येत होते दिनांक १३ ला रात्रीला सव्वा सातच्या दरम्यान देऊळगाव राजा जालना रोडवरील चैत्रबन धाब्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एम एच 28 बी क्यू 21 30 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून घटनेतील दुचाकी ला पाठीमागून गंभीर धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले, चार चाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकी वरील इसम हवेमध्ये उडून जमिनीवर पडले हे तेथील प्रत्यक्ष दर्शनी ने सांगितले, घटनेची माहिती तात्काळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अक्षय गुट्टे यांना देण्यात आले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ॲम्बुलन्स सह घटनास्थळ गाठले त्यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टर शेळके यांनी त्यांना मृत घोषित केले फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार चाकी वाहनाच्या चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये