Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकशाही हक्कांसाठी लढा

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्याच्या विरोधात भव्य आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्याच्या विरोधात वर्धा जिल्हा इंडिया अलायन्स – महाविकास आघाडी आणि पुरोगामी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वर्धा येथे भव्य आंदोलन केले.

यावेळी महाविकास आघाडीचे संयोजक अविनाश काकडे, प्रदेश काँग्रेस नेते शेखर शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नितेश कराळे, काँग्रेस नेते उदय मेघे,डॉ.सचिन पावडे,मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते यशवंत झाडे,आम आदमी पक्ष नेते प्रमोद भोंबले,काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल,संभाजी ब्रिगेड प्रदेश नेते तुषार उमाळे,सुरेश ठाकरे,रिपाइं ( ए )चे विदर्भ तथा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर,आदी महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने सहभागी होते या आंदोलनात स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे नागरिकांच्या हक्कांवर होणाऱ्या परिणामांचा तीव्र निषेध करण्यात आला.लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्याची आणि त्वरित निवडणुका घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये