ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपुरच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्थानिक शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील प्रा. डॉ.हेमचंद दुधगवळी यांना जाहीर झाला आहे.

येत्या 31 मार्च लासकाळी 11 वाजता नागपूर येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ चे अध्यक्ष डॉ दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ रवींद्र तिरपुडे यांनी कळविले आहे.

प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये