Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सहकार विद्या मंदिरात भरारी 2024 चे यशस्वी आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अंगीकृत कलेला दिला वाव 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

:देऊळगाव मही परिसरामध्ये नावारूपाला आलेली एकमेव सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांचे डान्स,नाटिका, गाणी इत्यादी द्वारे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या सादरीकरण करुन अंगीकृत कलेला वाव दिला. यावेळी पालक वर्गांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहनपर प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘भरारी 2024’ या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात उद्घाटन करून करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुकेशजी झंवर यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा कोमलजी झंवर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन प्रा. कमलेश खिल्लारे, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन खरात सर यांनी केले,प्रमुख पाहुणे डॉ.शिल्पा दंदाले,डॉ.अलका गोडे मॅडम,सरपंच कमल शिंगणे,सरपंचपती उमेश शिंगणे,सरपंच राजू गरड खैरव,सरपंच वरपे ताई मंगरूळ,संजय कोठारी, पत्रकार संतोष जाधव,पत्रकार इरफान अली,सिनेअभिनेते महेंद्रजी खिल्लारे,कक्ष सहाय्यक कैलास खेडेकर, बुलढाणा अर्बन बँक मॅनेजर देशमाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली.

‘भरारी 2024’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सचिन खरात , उपमुख्याध्यापक रोहित पऱ्हाड, पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन शिक्षक मंगेश खिल्लारे व केशव तळेकर सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये