ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत साठी सरपंच पदाची आरक्षण सोडत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणा बाबतची महत्त्वपूर्ण सोडत येत्या दि. 23 एप्रिल रोज बुधवारला ठीक दुपारी 2.00 वाजता तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत पहिला माला, सभागृहात होणार आहे.ही सभा तहसीलदार सतिश मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

 महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक सरपंच/ उपसरपंच नियम 1964 च्या नियम 2 अ( 1) (2) नुसार 2025 ते 2030 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती ऐकून 11,असून 6 महिना तर 5 सर्व साधारण पुरुष राहणार आहेत. अनुसूचित जमाती साठी एकूण 6 असून या मध्ये 3 महिला तर 3 पुरुष राहणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी महिला 10 तर पुरुष 10 असणार आहेत. आणि खुल्या प्रवर्गातील ऐकून 38 असून या मध्ये 19 महिला तर 19 पुरुष राहणार आहेत.व अशा प्रकाची सरपंच पदाची आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील सन 2025 ते 2030 मध्ये होणाऱ्या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुका या कालावधीत गटीत होणाऱ्या तालुक्यांतर्गत 75 ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने सरपंच पदाचे आरक्षण ठरविण्यात आलेले आहे.

तरी प्रत्येक गावातील तसेच सर्व नागरिकांनी या होणाऱ्या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन ब्रम्हपुरी तहसीलदार सतिश मासाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये