क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा दारूची अवैधरित्या वाहतूक

एकूण 2 लाख 40 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक – 19/07/2023 रोजी मौजा मांडवगड ते आष्टा रोडवरुन नाकाबंदी करुन खालील प्रमाणे प्रो.रेड संबंधाने कारवाई केली आहे. 1) एक पांढरे रंगाचे सुजुकी अँसेस मोपेड गाडी क्र. MH 32 AU 9616 कि. 80,000/- रू चे पायदानाजवळ दोन प्लास्टीक कँन मध्ये 56 ली. गावठी मोहा दारु कि. 11200 रु एकुन कि. 91,200/- रू चा माल आरोपी शैलेंद्र सुधाकर पवार रा. पारधी बेडा मांडवगड हा वाहतुक करतांना मिळुन आला. 2) बजाज पल्सर क्र. MH 32 AP 4404 कि. 75,000/- रू वर एका प्लास्टीक डबकीत 28 ली गावठी मोहा दारु कि. 5800/- रु एकुन कि. 80800/- रु चा मालाची आरोपी शैलेंद्र सुधाकर पवार रा. पारधी बेडा मांडवगड हा अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आला. 3) एक सिल्वर रंगाची स्प्लेंडर गाडी क्र. MH 31 BZ 4174 कि. 25000 रू वर एका प्लास्टीक डबकीत 14 ली गावठी मोहा दारू कि. 3000/- एकुन कि. 27000/- रू चा माल सोनु सचिन पवार वय 26 वर्ष* रा. पारधी बेडा मांडवगड हा अवैद्यरित्या वाहतुक करताना मिळुन आला. 4) एक काळ्यारंगाची स्प्लेंडर क्र. MH 32 AU 6855 कि. 35000 रू वर एका प्लास्टीक डबकीत 30 ली गावठी मोहा दारु कि. 6200 रु एकुन कि. 41200 रू चा माल आरोपी अरविंद गुनवंता भोसले हा अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आला. चार गुन्ह्यातील एकूण माल किंमत रु.2,40,200 रू चा दारू मोटार सायकल असा मुद्देमाल मिळुन आलेला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक साहेब वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वर्धा, पोलीस निरिक्षक चाकाटे यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. सेवाग्राम यांनी केली…

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये