जडवाहतुकीस शहरात प्रवेश बंद व पर्यायी मार्गाचा वापर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यामध्ये दिनांक ११/१०/२०२६ पासुन नवरात्र उत्सव सुरु झाला असुन यादरम्यान वर्धा जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये भावीकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातुन व इतर लगतचे जिल्ह्यातुनही भावीक शहरामध्ये येत असतात. त्यामुळे शहरात जड वाहने, बसेस, ट्रॅव्हल्स आल्यास वाहतुक कोंडी होवून भावीकांची गैरसोय होवू शकते तसेच अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्याअनुषंगाने नवरात्र उत्सवाच्या कालावधीत मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये. तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होवू नयेत. नागरीकांना व भाविक भक्तांना वाहतुक कोंडीचा त्रास होवु नये व कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरीता सार्वजनिक ठिकाणची रहदारी व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मा. सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वाहतुकीसंबंधात जडवाहतुकीस शहरात प्रवेश बंद व पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत खालीलप्रमाणे अधिसुचना आज दिनांक १६/१०/२०२६ पासुन निर्गमित केली आहे.
-०० वर्धा (शहर) ००- १) वर्धा शहरामध्ये दिनांक १६/१०/२०२६ चे सकाळी ०८.०० वा. पासुन ते दिनांक २४/१०/२०२६ चे मध्यरात्री ०२.०० वा. पावेतो वर्धा शहरामध्ये जड वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच बसेस, ट्रव्हल्स व इतर चारचाकी वाहने यांचे मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
२) उपरोक्त नमुद तारीख व वेळेत आर्वी, नागपुरकडून यवतमाळकडे जाणारे जड वाहनांनी दत्तपुर उड्डाणपुल, नागठाणा उड्डाणपुल बायपासमार्गे जातील.
३) उपरोक्त नमुद तारीख व वेळेत जड वाहनांनी आर्वी, नागपुरकडून हिंगणघाटकडे जाणारी वाहतुक ही डोडाणी चौक ( दत्तपुर चौक), मसाळा बायपास, सेवाग्राम उड्डाणपुल ते शेडगांव फाटा ते जाम मार्गे हिंगणघाट जातील.
४) आर्वी व नागपुरकडून वर्धा शहरामध्ये येणारे तसेच यवतमाळ व हिंगणघाट कडून वर्धा शहरातुन नागपुरकडे जाणारे म.रा. परीवहन च्या बसेस व खाजगी बसेस ह्या जुनापाणी चौक ते दत्तपुर चौक ते धुनीवाले चौक, आरती चौक मार्गे, पोस्ट ऑफीस चौक व बजाज चौक मार्गे जातील.
५) वर्धा शहरांत बाहेरुन दर्शनाकरीता येणारी भावीकांची वाहने ही आर्वीनाका चौक ते बजाज चौक या दरम्यान रस्त्यावर कुठेही पार्क करणार नाहीत.
सदर अधिसुचना वर्धा शहराकरीता दि. १६/१०/२०२६ चे सकाळी ०८.०० वा. ते दि. २४/१०/२०२६ चे मध्यरात्री ०२.०० वा. पर्यंत अंमलात राहील.-०० आर्वी शहर०० त्याचप्रमाणे आर्वी शहरात छ. शिवाजी महाराज चौक, म. गांधी चौक, जुना न्यायालय परीसर, इंदीरा गांधी चौक, कृषी उत्पन्न बाजारपेठ, जवाहरलाल नेहरु मार्केट, इंदीरा मार्केट या ठिकाणी दिनांक १६/१०/२०२६ पासुन ते २५/१०/२०२६ चे १९.०० ते २३.०० वा.पावेतो जड वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) आर्वी शहरात प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सदर अधिसूचना आर्वी शहराकरीता दि. १६/१०/२०२६ ते दि.२५/१०/२०२६ चे १९.०० वा २४.०० वा.पर्यंत अंमलात राहील.
-०० देवळी ००-
त्याचप्रमाणे देवळी शहरामध्ये दिनांक २०/१०/२०२६ चे सकाळी ०८.०० वा. पासुन ते दिनांक २३/१०/२०२६ चे २४.०० वा. पावेतो देवळी शहरातील टिळक चौक, ठाकरे चौक, शिवसेना चौक, इंदीरा चौक, म. गांधी चौक, स्टेडीयम चौक, आठवडी बाजार चौक तसेच बसस्थानक चौकातुन जाणारी जडवाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. नागरीकांना पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे आवाहन करण्यात येते.
दरम्यान वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता सर्व नागरीकांनी वर नमुद मार्गाने प्रवास करावा. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते.
सदर अधिसुचना देवळी शहराकरीता दि. २०/१०/२०२६ चे सकाळी ०८.०० वा. ते दि. २३/१०/२०२६ चे २४.००वा. पर्यंत अंमलात राहील.
करीता नवरात्रउत्सवाचे काळात नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळून व वाहतुकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे पोलीस विभाग व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कडून आवाहन करण्यात येत आहे
(विजयकुमार घुले) सहायक पोलीस निरीक्षक जि.वा.नियंत्रण शाखा, वर्धा



