वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी अवैध सुंगधीत तंबाखु व गुटखाचा साठा केला जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 19/06/2023 रोजी कार्यालयीन कामकाज करीत असतांना मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी वर्धा रेल्वे स्टेशन गेट समोरील अमृत टेड्रर्ड्स यांचे दुकानावर रेड केला असता आरोपी नामे अमर मुलचंद गेलानी वय 45 वर्ष रा. दयाल नगर, वर्धा यांचे गोडावुन मधुन 1 ) 500 ग्रॅमचे 555 @ कंपनीचे सुंगधीत तंबाखुने भरून असलेले सिलबंद एकुन 54 पॅकेट, 2) 500 ग्रॅमचे रेस कंपनीचे सुंगधीत तंबाखुने भरून असलेले सिलबंद एकुन 20 पॅकेट, 3) राज निवास कंपनीचे सुंगधीत पान मसाला (गुटखा) ने भरून असलेले सिलबंद एकुन 48 पॅकेट, 4) पानपराग कंपनीचे सुंगधीत पान मसाला (गुटखा ) ने भरून असलेले सिलबंद एकुन 9 पॅकेट, 5) विमल कंपनीचे केसर युक्त पान मसाला 132 ग्रॅमचे (गुटखा) भरून असलेले सिलबंद एकुन 22 पॅकेट, 6) वि – 1 कंपनीचे (Happy Holi) तबाखुने भरून असलेले सिलबंद एकुन 22 पॅकेट असा एकुन जु. की 36,936 /- रू चा माल मिळुन आला वरून आरोपी यास सदर पान मटेरीयल, गुटखा, सुगंधीत तबांकु कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता आरोपी यांने सांगीतले की पान मटेरीयल, गुटखा, सुगंधीत तबांकु हा नविन सुरेशकुमार आहुजा रा. दयाल कृष्ण दरबार जवळ, दयाल नगर वर्धा यांनी आनुन दिला असल्याचे सांगीतल्याने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 621 / 2023 कलम 328,272,273,34 भा.द.वि सहकलम 26 (1),26 (2)(iv), 27 (3)(e), 30 (2) (a) 3 (1) (zz ) (iii) 59, अन्न सुरक्षा व मानदे कायदा अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर, येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री आबुराव सोनवणे सा. याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे नापोशि अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, प्रमोद वाघमारे, राजु वैध, संदीप अलोने तसेच श्री किरण गेडाम, श्री राजेश यादव, अन्न सुरक्षा अधिकरी, वर्धा अमीत तृपताने यांनी यशस्वी रित्या पार पाडली.