ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती ते शेणगाव रस्त्यालगत मुरूमाचे अवैध उत्खनन जोमात!

वनसंपत्तीचे रक्षण आणि जतन करण्यास जिवती वनविभाग ठरतोय अपयशी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती हा तालुका अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग, नक्षलग्रस्त तसेच मोठया प्रमाणात वनसंपत्ती असलेला तालुका आहे, पण काही दिवसांपासून या तालुक्यातील वनसंपत्तीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे, नैसर्गिक गौण खनिज उपसा व पर्यावरणाला हानीकारक प्रकारासंदर्भात शासनाचे कठोर धोरण आहे. असे असतानाही तालुक्यात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात मुरूमाचे अवैध उत्खनन केले जात आहे.

यात मुख्य वनपरिक्षेत्र कार्यालया पासून अगदी हाकेच्या अंतरावर जिवती ते शेणगाव मार्गावरील विदर्भ महाविद्यालयाच्या समोरील घाटात डोंगर पोखरून अवैध मुरूमाचे उत्खनन जोमाने सुरू असून व येथील मुरूम हा शहरातील बांधकामात मोठया प्रमाणात वापरला जात असल्याची माहिती आहे. सध्या तालुक्यात अवैध रेतीचा विषय तर सर्वश्रृत असतानाच, या पाठोपाठ आता मुरूमाचेही अवैध उत्खनन केले जात आहे.

जिवती शहरात राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाचे व वनविभागाचे अधिकारी मात्र याबाबत कोणावरही कारवाई करताना दिसत नाहीत.गौण खनिज तस्करांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे. जिवती ते शेणगाव रस्त्यावर शेकडो ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसत असले तरी मात्र वनविभाग व महसुल विभाग यांच्याकडून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही. हा संशोधनाचा विषय झाला आहे. व परवानगी नसताना शेकडो ब्रास मुरूम खोदून त्याची दिवसाढवळ्या वाहतूक केली जात आहे.

तरी या गौण खनिज संपत्तीचे अवैध उत्खनन करणाऱ्यावर वनविभाग व महसुलविभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये