ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवाहितेचा छळ केल्याबाबत आरोपींना दोन वर्ष कारावास

तसेच,पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          सविस्तर वृत्त असे की,गोधनी रोड, गणपती नगर, नागपूर येथील माधुरी अर्जुनलाल कैथवास हिचे दिनांक 6 फेब्रुवारी 2010 रोजी आरोपी नामे कन्हैया नारायण बौरसिया याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर माधुरी आरोपींकडे नांदावयास गेली त्यानंतर पाच ते सहा महिने आरोपींनी तिला व्यवस्थित वागविले नंतर आरोपी कन्हैया दारू पिऊन माधुरीला मारहाण करायचा व त्याचे आई-वडील त्याला मारहाण करण्यास उत्तेजित करायचे.

कन्हैया चे इतर नातेवाईक माधुरीला मुल होत नाही, म्हणून तिला टोमणे मारायचे आणि माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावायचे माहेरून पैसे न आणल्यास व बाळ न झाल्यास तिला सोडून देण्याच्या धमक्या देऊन तिला माहेरी पाठवायचे. माहेरून पैसे आणण्याची मागणी पूर्ण केल्यामुळे आरोपी कन्हय्याने माधुरीला हात बुक्क्यांनी मारहाण केली आणि तिला तिच्या माहेरी जाऊन राहण्यास मजबूर केले. बेकायदेशीर पैशाच्या मागणीसाठी व मूळ बाळ होत नाही या कारणावरून आरोपी फिर्यादी माधुरी हिला नांदविण्यास नकार दिला व तिची शारीरिक मानसिक प प्रताडना केली.

त्यामुळे माधुरीबौरसिया ने दिनांक 26 फेब्रुवारी 2014 रोजी पोलीस स्टेशन गिट्टीखदान नागपूर येथे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधानाची कलम 498 अ व 406 अंतर्गत आरोपी नामे कन्हैया नारायण बौरसिया, कुंदनलाल नारायण बौरसिया, सीमा कुंदनलाल बौरसिया, गीता नारायण बौरसिया, नारायण बालगोविंद बौरसिया, किशोर बालगोविंद बौरसिया आणि सौ अनिता किशोर बौरसिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याच्या तपासांती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १०, नागपूर यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याच्या संपरीक्षेदरम्यान आरोपी नारायण बौरसिया यांचे निधन झाले. विद्यमान न्यायालयात अभियोग पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. अभियोग पक्षातर्फे न्यायालयात सादर केलेला साक्ष पुरावा व विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमृता सोले पंडित यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी श्रीमती गरिमा बगडोदिया यांनी मयत आरोपी वगळता इतर सर्व आरोपींना भारतीय दंडविधानाचे कलम 498 अ अंतर्गत दोशी ठरवून त्यांना प्रत्येकी दोन वर्ष साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच सर्व आरोपींनी एकत्रित आणि विभक्तरित्या रक्कम रुपये पाच लाख दोन महिन्याच्या आत नुकसान भरपाई म्हणून पीडित माधुरी बौरसिया हिला देण्याचे आदेश अंक 14 फेब्रुवारी 2024 रोजी पारित केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये