ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे वसंत पंचमीचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

         दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्माजीच्या मुखातून बुद्धी आणि विद्येची देवी सरस्वती प्रकट झाली आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाज प्राप्त झाला.

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने आणि मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते .तसेच या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो. भारतात साधारणता मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होत असताना येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी नृत्यादी कला शिकवणाऱ्या संस्था विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असते.सुफीपरंपरेतील चिस्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शाहीर मोहरीच्या पिवळ्या फुलाच्या रंगात बुडविले वस्त्र नेसून हा सण साजरा करतात.पेशव्यांच्या काळात हा उत्सव महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख आहे.

या दिवशी स्त्री पुरुष आपल्या नातेवाईकांना फुलांचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांचा गुच्छ भेट म्हणून देतात. डोक्यावरील पागोट्यात तो कंसाचा तुरा रोवत असत.याच दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची ही पद्धत आहे. फुले, फळे, मिठाई यांची देवाण-घेवाण होत असते. बाजीराव पेशव्यांच्या काळात सरदार सोबत हा उत्सव साजरा केला जात. केशरी रंगाची उधळण केली जात असे इत्यादी सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक कृष्णा लाभे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये