निमणी-हिरापूर-चिंचोली रोडचे भूमिपूजन
बीजेपी सरकारने दिली होती स्थगिती : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली., अखेर तीन वर्षांनंतरची प्रतीक्षा संपली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कोरपना राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी-हिरापूर चिंचोली रोडमागील तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता परंतु ग्रामीण भागाला विकासापासून दूर ठेवण्यासाठी बीजेपी सरकारनी स्थगिती दिली होती परंतु आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने अखेर तीन वर्षांनंतररची प्रतीक्षा संपली असून ३ कोटी ५० लक्ष रोडच्या कामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर कनिष्ठ अभियंता कोवे मॅडम ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर पद्माकर पिदूरकर विलास कोंगरे ठेकेदार विलास सोनटक्के गजानन गोबाडे मनोज धोटे प्रमोद देठे गुलाब पवार रमेश टेकाम मधुकर मालवे संतोष गारघाटे रंजित गौरकर शुभम राजूरकर सुमन जगताप सरस्वता उईके विठाबाई पिदूरकर प्रकाश देवगडे विशाल देवगडे रामकीसन देवगडे रामदास कोडापे राजू बांगडे अविनाश गौरकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले की मागील तीन वर्षांपासून हा रोड मंजूर होता परंतु बीजेपी सरकारच्या मनमानी कारभारामुळे या सर्व कामाला स्थगिती दिल्यामुळे कित्येक गावं विकासापासून दूर राहिले होते अखेर आम्ही न्यायालयीन लढाई जिंकल्याने उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्याने या सर्व कामाला प्रारंभ होऊन कामे पूर्णत्वास आली आहे असे मत व्यक्त केले यावेळी निमणी परिसरातील गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले.