ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक सभागृह हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरले पाहिजे – अरूण भाऊ धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

           समाजात सामाजिक ऐक्य असेल तर समाज गुन्यागोविंदाने जगू शकतो ,एकमेकांना मदत करू शकतो आणि समाजावर आलेल्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो त्याचबरोबर आपल्या लहान मुलांना सुसंस्कृत करू शकतो यासाठी समाजामध्ये सामाजिक ऐक्य गरजेचे आहे हे सामाजिक भवन सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठराव असे प्रतिपादन राजुरा न.प.चे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे यांनी भदंत संघप्रिय बहुउद्देशीय मंडळ गडचांदूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आपले उद्घाटक म्हणून विचार प्रतिपादन केले, व या प्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या अनुपस्थित राजुरा चे मा. नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, नगराध्यक्ष सविता ताई टेकाम, व नगरसेवक राहुल उमरे यांच्या निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ला मेश्राम लेआउट गडचांदूर येथे माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या अनुपस्थितीत उद्घाटक म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी गडचांदूरकरांवर भरभरून प्रेम केले आहे गडचांदूरचा विकास करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून सर्व जाती धर्माच्या प्रतिकांचा तसेच गडचांदूर मधील नाली ,रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठीही निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले आहे, नगरपरिषद गडचांदूर साठी निधी उपलब्ध करून देऊन सर्वसमावेशक असा विकास केला आहे असे ते म्हणाले

   या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रा. कीर्तीकुमार करमणकर यांनी हे सामाजिक भवन धम्माचे संस्कार केंद्र बनावे आणि त्यातून सामाजिक ,सांस्कृतिक प्रगती करणारी पिढी जन्माला यावी असे म्हटले आहे

     या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता ताई टेकाम यांनीही या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आपले विचार करताना म्हटले आहे मेश्राम ले आउट मधील सर्वसामान्य लोकांच्या इच्छेनुरूप हे देखणं सामाजिक सभागृह या ठिकाणी उभे झाले आहे तेव्हा या सामाजिक सभागृहाचा उपयोग इथल्या लोकांनी समाज कल्याण साठी करावा असे म्हटले आहे डॉ.हेमचंद दूधगवळी यांनी हे सभागृह सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे केंद्र बनावे व विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणून उपयोगात यावे असे म्हटले तर प्रा.प्रशांत खैरे सर यांनी हे सामाजिक भवन संपूर्ण गडचांदूर वासियांना प्रेरणा केंद्र ठरावे असे प्रतिपादन केले आहे त्याचबरोबर डॉ. चरणदास मेश्राम यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच नगरसेवक राहुल उमरे यांनी या सामाजिक भवनाच्या निर्मितीसाठी करावा लागलेला पाठपुरावा याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकमल वाघमारे, अभिजीत भाऊ धोटे, अरविंद मेश्राम, नगरसेविका अर्चना वांढरे, कल्पना निमजे, सोमेश्वर सोनकांबळे, महेंद्र ताकसांडे, मारोती लोखंडे सर, अहमद भाई तसेच संपूर्ण भिक्खु संघ उपस्थित होते.

    या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते दशरथ डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी रवी ताकसांडे यांनी केले आहे

   या उद्घाटकीय कार्यक्रमानंतर पूज्यनीय भंते धम्म घोष महाथेरो, भंते कश्यप आणि भिख्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची मेश्राम ले आउट मधून रॅली काढण्यात आली व पूज्य भंतेजीच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचे समाज प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कीर्तनासाठी मेश्राम लेआउट आणि गडचांदूरातील मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते.

  सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा बुद्धमूर्तीची स्थापना आणि समाज प्रबोधन कीर्तन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेणारे भदंत संघप्रिय बहुउद्देशीय मंडळ गडचांदूर चे घनश्याम पिपरे, रमाताई धोंगडे, गजानन ताकसांडे, सुरेश चांदेकर, तुकाराम दुर्योधन, बाळकृष्ण शेंडे, धर्मपाल गावंडे आणि मंडळाचे सर्व सदस्य यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे कार्यक्रमाचे आभार सचिव गजानन ताकसांडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये