ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेंबाळ येथे श्री मार्कंडेय जयंती साजरी

पद्मशाली समाजाने संघटीत होण्याची गरज - प्रा. विजय आकनुरवार 

  चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

-पद्मशाली समाजाच्या विकासासाठी आणि आपल्या न्याय हक्ककासाठी पद्मशाली समाज संघटित होणे हे काळाची गरज असल्याचे मत विदर्भ पद्मशाली समाज संघमचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी व्यक्त केले ते बेंबाळ पद्मशाली समाजाने आयोजित केलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत श्री महामुनी मार्कंडेय ऋषी यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच विजय बोंमावार, रत्नाकर बोर्डेकर,ग्रामपंचायत सदस्य विनोद वाढई, शंकरराव आकनुरवार, प्रदीप भोगावार,अरुण आकनुरवार,प्रमोद बोडूवार,नंदू आकनुरवार,समाजाचे अध्यक्ष धनंजय आकनुरवार आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम श्री मार्कंडेय ऋषि यांच्या प्रतिमेची पूजा व आरती करण्यात आली मार्कंडेय ऋषी यांच्या जीवनावर एकपात्री नाट्य प्रयोग सौ हिना रेब्बावार यांनी सादर केली याच कार्यक्रमात बेंबाळ पद्मशाली समाजाच्या वतीने डॉ यश आकनुरवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली.

यानंतर श्री मार्कंडेय ऋषि यांची जन्मोत्सव निमित्ताने गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली रुद्र आकनुरवार यांनी मार्कंडेय ऋषी यांची भूमिका साकार केली या कार्यक्रमात प्रास्तविक भाषण माजी सरपंच विजय बोंमावार यांनी केले तर संचालन ओम आकनुरवार यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय आकनुरवार यांनी केले या जन्मोत्सव कार्यक्रमात भारत आकनुरवार,सुहास आकनुरवार,गजानन आकनुरवार,चंद्रकांत बोंमावार, रुपेश अंनमलवार,रमेश अंनमलवार,दिलिप चेनूरवार,बबन चिंदमवार,कवीश्वर बोंमावार आदी उपस्थित होते या कार्यक्रमात पद्मशाली समाजाचे बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये