ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर येथे वसंत पंचमी उत्सव साजरा

चांदा ब्लास्ट

श्री महर्षी विद्या मंदिर, दाताला चंद्रपूर येथे वसंत पंचमी उत्सव मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक -शिक्षिका उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील सरस्वती मातेच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व धर्माच्या सणांची, संस्कृतीची ओळख व माहिती व्हावी यासाठी शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.

त्याप्रमाणेच आज देखील शाळेत वसंत पंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक, सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार, सदस्य श्रीमती. अलका चांडक तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती. निशा मेहता यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी वर्ग ३ री च्या विद्यार्थिनी ने सरस्वती स्तवन तसेच सरस्वतीच्या श्लोकांचे सुरेख आवाजात गायन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती. विशाखा राजूरकर यांनी केले तर श्रीमती. अनिता अनमदवार यांनी मुलांना या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्री. गिरीश चांडक सर यांनी या उत्सवानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांनी श्लोकाचे व मंत्राचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच उपस्थित सर्वानी वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यात शाळेचे कला शिक्षक गणेश सर यांचा शाळेच्या मंदिराच्या सजावटीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. शाळेचे सर्व शिक्षक, क्रीडाशिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये