ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांची अवैध दारू वाहतूकीवर रेड कारवाई

सर्व मुद्देमाल जप्त., आरोपी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 11.05.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे देवळी हद्दीत प्रो. रेड करून एकपाला फाटा रोड देवली येथून एकूण 11,11,200/-रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे

कारवाईत आरोपी – 1) चेतन गंगाधरराव कठाने वय 28 वर्ष रा. वायफळड ता. वर्धा जि वर्धा 2) राजु भाऊरावजी जबडे रा. देवळी यांचेकडून जप्त मुद्देमाल -१) एक ह्युंदाई क्रेटा कार क्र MH 12 MW 6068 किँमत 10,00,000/- ₹2) 180 मिली चे देशी दारूने भरलेल्या एकूण 240 बॉटल किँमत 48,000/-₹3) 90 ml चे देशी दारूने भरलेले 200 बॉटल्स किंमत 20,000/-₹4) ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीचे विदेशी 144 बॉटल्स किंमत 43200/-₹ असा एकूण 11,11,200/-₹ चा मुद्देमाल आरोपी यांचे तसेच गाडीचे डीक्कीतून जप्त करण्यात आला.

       गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. देवळी चे डुटी ऑफिसर पो. उपनी गजभिये व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

    सदरची कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, सुगम चौधरी, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा व चालक पो. अ. शुभम बहादुरे पो.मु. वर्धा तसेच पो. स्टे. देवळी येथील स्टाफ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये