ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कुंभेझरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक लोडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव मोतेवाड, कोषाध्यक्ष जयाबाई नामवाड, मुख्याध्यापक निब्रड, प्रा सुग्रीव गोतावळे, लहू गोतावळे,पुष्पाताई पट्टेवाले, ताई पवार, संतोष पवार, अंबादास जाधव, प्रकाश राठोड, भीमराव कोडापे, चंद्रकांत होणेराव,संतोष गोतावळे, तुरानकर, कमळताई गोतावळे, शिल्पाताई मोतेवार, सुरेखा देशकर, सुरेखा गोतावळे, सुमनताई बसवंते,भानुदासजी जाधव, डॉ. पांडुरंग भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. मोतेवाड, नामवाड,लोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजागीता नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वावरे यांनी केले. ‘एक पेड माँ के नाम अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, तसेच स्पर्धा परीक्षेत प्रथम व द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता वर आधारीत नाटिका सादर करण्यात आली.

ध्वजारोहण कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, माता पालक व माजी विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाघमारे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये