जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ७५० वा जयंती सोहळा साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन शासन निर्णयानुसार करण्यात आले.
या सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत वडगाव शाळा व्यवस्थापन समिती वडगाव व सर्व गावकरी पालक बंधू भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेने सजवलेली पालखी संपूर्ण गावामध्ये पोहोचली. यानंतर पदावली भजन मंडळ यांनी आपल्या चमू सहित ज्ञानेश्वर माऊलींचे भजन गायले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत वडगाव चे उपसरपंच श्री सुदर्शन डवरे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे गुरुजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश निमकर उपाध्यक्ष प्रियंका उरकुडे पदावली भजन मंडळीचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील अबालवृद्धांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
अंगणवाडी कार्यकर्ती मालती पावडे, शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके, विनायक मडावी, पुष्पा इरपाते, नितीन जुलमे ,अनिल राठोड व काकासाहेब नागरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत वडगाव चे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन काकासाहेब नागरे यांनी केले कार्यक्रमाची सांगतात पसायदानाने झाली.