देऊळगाव राजा शहरात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा
तिरंगा एकता रॅलीने शहर दुमदुमले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे ध्वजारोहण करण्यात आले.
तहसील कार्यालय
तहसील कार्यालयात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी ध्वजारोहण केले, पोलिस पथकाने मानवंदना दिली, याप्रसंगी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी, नायब तहसीलदार सायली जाधव, डॉ संतोष मुंढे, माजी सैनिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षांचे,नेते, कार्यकर्ते,पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी , उपस्थित होते.
नगर परिषद
नगर परिषद कार्यालयात ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळं यांनी ध्वजारोहण केले, याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व पत्रकार उपस्थित होते.
पोलिस स्टेशन
पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी ध्वजारोहण केले, याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक
एक वादळ भारताच टीम आणि नगर परिषद देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले.
मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार,शालेय विद्यार्थी, उपस्थित होते, यावेळी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली, रॅली मध्ये शालेय, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, देशभक्तीपर गीत, व घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते,