घुग्घुसात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : शहरातील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात असंख्य देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. लहान मुलांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मनोगत व्यक्त करताना विवेक बोढे म्हणाले की, “नागरिकांनी देश प्रगत करण्यासाठी आपापली कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत. समाजकारणाची दिशा पकडून सेवा, सेवा आणि फक्त सेवा केल्यानेच देशाची प्रगती शक्य आहे. जाती-धर्मापेक्षा १५ ऑगस्ट हा सर्वात मोठा उत्सव आहे.”
कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जि.प. माजी सभापती नितुताई चौधरी, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, अध्यक्षा किरणताई बोढे, भाजयुमोचे अमोल थेरे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, पत्रकार सुरेश खडसे, सतीश बोन्डे, हेमंत पाझारे, दिनेश बांगडे, कुसुम सातपुते, लक्ष्मी नलभोगा, वैशाली ढवस, सुचिता लुटे, गणेश कुटेमाटे, इर्शाद कुरेशी, रत्नेश सिंग, सिनू रामटेके, समय्या कटकम, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, मुस्तफा शेख, अमीना बेगम, आबेदा पठाण, नाजमा कुरेशी, शिल्पा थेरे, पुष्पा रामटेके, मोमीन शेख, असगर खान, दिलीप कांबळे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हेमंत कुमार, राजेंद्र लुटे, सांबशीव खारकर, निरंजन नगराळे, अनिल नित, जनाबाई निमकर, सुनीता पाटील, वंदना मुळेवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.