महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वातंत्र्यदिनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व विद्या मंदिर, गडचांदूर येथे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रगीत, राज्यगीत, स्काऊट गाईड प्रार्थना व झेंडा गीत सादर करून राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा भाव अनुभवास आला.
मुख्य कार्यक्रमात संस्थेच्या सहसचिव श्रीमती उज्ज्वलाताई धोटे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य स्मिता चिताडे, माजी उपसभापती रऊफ खान,उपमुखाध्यापक डाहुले, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, पर्यवेक्षिका माधुरी मस्की यांचा समावेश होता. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांच्या हस्ते स्काऊट, गाईड व आर एस पी चा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून देशभक्तीचे दर्शन घडविले. परिसर ध्वजमय करण्यात आला होता.
याआधी १३ ऑगस्ट रोजी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्राचार्य तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तर १४ ऑगस्ट रोजी विठ्ठलराव थिपे, उपाध्यक्ष,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, घोषणा सादर करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले.
राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून घेतली आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची शपथ घेतली.