ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम

चंद्रपूर जिल्हा कारागृहात उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग १ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी जिल्हा कारागृहात देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभक्तीपर गीते सादर करून बंदीबांधव व बंदीभगिनी मंत्रमुग्ध झाले.

जिल्हा कारागृहातील सभागृहात सकाळी ९.३० वाजता देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, जिल्हा कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, प्रकल्प संचालक मनीषा पडगेलवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी के.बी. मिराशे, सतीश सोनवने, मिलिंद बनसोड, प्रकाश लोमटे, मुख्य लोकभिरक्षक विनोद बोरसे, कारागृह शिक्षक हटवादे, रोटरीचे माजी अध्यक्ष सचिन गांगरेड्डीवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मनीषा पडगिलवार व सहकाऱ्यांच्या देशभक्तीपर सामूहिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर ऐ मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर भावनिक गीत मनीषा पडगिलवार यांनी सादर केले. यावेळी सचिन गांगरेड्डीवार, अजय मार्कंडेवार, जितेंद्र व निशा जनबंधू यांनी युगल गीत सादर केले.

तर डॉ. लक्ष्मीकांत सरबेरे, राजेश गण्यारपवार यांनी जोषपूर्ण गीत सादर केले. जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी कानडा विठ्ठल हे भजन , खायके पान बनारस वाला हे गीत सादर करून बंदी बांधवांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी के.बी. मिराशे यांनी मेघा रे मेघा रे युगल गीत सादर करून मनोरंजन केले.

कारागृह शिपाई संदीप जोशी शिपाई शीतल भगत, रमा आवळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

यावेळी बंदी बांधवांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाला अविनाश रघुशे, राजु अडकिने, जयश्री गण्यारपवार, मिलिंद गंपावार आदी उपस्थित होते. साऊंड सिस्टीमची अतिशय सुंदर व्यवस्था बहादूर हजारे यांची होती. आभार कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये