ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भातील नावाजलेली सिपीएल क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

सेंट मायकेल शाळा मैदानावर १८ दिवस चालणार १६ संघांमध्ये चुरस

चांदा ब्लास्ट

प्रीमियर लीग टी ट्वेन्टी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील लाईफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाते. स्थानिक सेंट मायकेल शाळा मैदान येथे यासाठी हिरवेगार मैदान खास तयार केले गेले आहे. या स्पर्धेसाठी ३५० क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यानंतर रीतसर लिलाव प्रक्रियेद्वारे प्रत्येकी १५ खेळाडूंचा समावेश असलेल्या १६ चमुंचे गठन केले गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुभवी आणि नवोदित क्रिकेटपटूना या स्पर्धेद्वारे नैपुण्य दाखविण्याची संधी दिली जाते. सिपीएल स्पर्धेचे हे दहावे पर्व आहे.

बुधवार १० जानेवारीपासून सामन्यांना उत्साही प्रारंभ होत असून उदघाटन सोहळ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, वेकोली वणी क्षेत्राचे महाव्यवस्थापक आभासचंद्र सिंग, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदींची उपस्थिती राहणार आहे. गेली काही वर्षे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सीपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून यासाठी मान्यताप्राप्त दर्जाचे पंच, आणि इतर आवश्यक बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

पहिल्या दिवशीचा सामना  भद्रावती ग्रेनेड्स विरुद्ध राजुरा रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. यानंतर रोज एका दिवशी २ लीग सामने खेळविले जाणार आहेत. विजेत्या संघाला १ लाख २५ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय तुमराम, आरीफ खान, सुनील रेड्डी, अरविंद दीक्षित, नाहीद सिद्दीकी, बालू भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत. या स्पर्धेला प्रतिसाद देत चंद्रपूरच्या क्रिकेटपटूंचा उत्साह वाढविण्याचे आवाहन लाईफ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये