Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म.रा.शि.प. चंद्रपूर तर्फे धरणे व मुंडण आंदोलन

सीबीएसई (इंग्रजी माध्यमाच्या शाळा) येथील कर्मचारी व विद्यार्थी यांच्या न्याय मागण्यासाठी निवेदन

चांदा ब्लास्ट

      महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर तर्फे कॉन्व्हेंट, CBSE (इंग्रजी माध्यमाच्या शाळा) येथील कर्मचारी व विद्यार्थी यांच्या न्याय मागण्यासाठी आज दि. 4 सप्टेंबर 2024 ला जिल्हा परिषद दालनात दुपारी 3 ते 5 या वेळेत धरणे व मुंडण आंदोलन करण्यात आले असून त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

1. कर्मचाऱ्यांना 1981 नियम 9 (5) अनुसुची ड प्रमाणे नियुक्ती आदेश व शासनमान्यता देण्यात यावी.

2. दुय्यम सेवा पुस्तकाची प्रत देण्यात यावी.

3. प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचाऱ्यांना MEPS 1981 नुसार पूर्ण वेतन Cl , El देण्यात यावे.

4. प्रायव्हेट 4 कॉन्व्हेंट स्कूल या शाळेत 90 टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्यांनाMEPS 1977 शालेय कायदयानुसार वैद्यकीय सुविधा व प्रसुती पूर्व वेतनसह रजा देण्यात यावी.

5) प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचारी सेवानिवृत झाल्यानंतर त्यांना ग्रॅच्युइटीचा पूर्ण लाभ देण्यात यावा

6) प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्या करीता महाराष्ट्र शासनाद्वारे लागू असलेली राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्यात यावा.

7) मा: शिक्षाण उपसंचालक यांचा 10 ऑगस्ट २०२० चा ओदेश तात्काळ लागू करावा.

8) वारंवार शिक्षण संस्थाचालक MEPS 1981 कायदयांचे उल्लघंन करून कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषन करीत आहे. याकरीता शिक्षण संस्थाचालकाच्या विरोधात पीडीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा नोंदविण्याबाबत व अंतिम निकाल लागेपर्यंत त्याला नोकरीत संरक्षण देण्याबाबत येत्या अधिवेशनात प्रभावी कायदा करण्यात यावा.

9. मा. उच्च न्यायालय औरंगाबाद, खंडपीठ केस. नं. 3522/2016 निकाल 21/3/2017 रंजना जोशी व इतर विरूद्ध ज्ञान माता, विद्या विहार, कामठा रोड, नांदेडचा निकालाची राज्यात अंमलबजावणी करावी. अश्या अनेक मागण्यांना घेऊन मुंडण आंदोलन करण्यात आले.

यावेळी अजय वानखेडे, विभाग अध्यक्ष, म. रा. शि. प., विनोद पांढरे, उपाध्यक्ष., सुभाष गोतमारे, कार्यवाह विभाग., विकास खोंड, अध्यक्ष चंद्रपूर ग्रामीण., विवेक आंबेकर, अध्यक्ष कॉन्व्हेन्ट विभाग म. रा. शि. प., देविदास चवके, तालुका अध्यक्ष., वसंता वडस्कर, कार्यवाह चंद्रपूर शहर., सुधीर पाचखेडे, सदस्य., यादव पजई, सदस्य नागपूर., कविता कोटेवार, महिला सदस्य., प्रवीण कडू, कॉन्व्हेन्ट विभाग, सदस्य., अतुल घरोटे, कॉन्व्हेन्ट विभाग, सदस्य., इ. प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये