Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट

दि. 04/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे विसावा टि-पॉईंट, पाणी पुरवठा कार्यालय जवळ वर्धा येथे सापळा रचुन नाकेबंदी करीत एका मिल्ट्री ग्रीन रंगाच्या बर्गमॅन मोपेड क्र. MH-32./AV-6202 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता,

सदर मोपेडचे डिक्कीत व एका प्लास्टीक चुंगडी व थैलीमध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल मिळुन आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन 1) एक मिल्ट्री ग्रीन रंगाची बर्गमॅन मोपेड क्र. MH-32./AV-6202 किं. 1,00,000 रू. 2) विदेशी दारूने भरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 180 एम.एल.च्या 118 सिलबंद शिशा कि. 41,300 रू असा जु.किं. 1,41,300 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे 1) इंद्रजित उर्फ कार्तिक गजानन दुबे, वय 25 वर्ष, रा. पुलफैल वर्धा, 2) दद्दु सुनिल जवादे, रा. पुलफैल वर्धा (दारू माल देणारा) यांचेवर पोलीस स्टेशन वर्धा षहर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये