Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व अल्पसंख्यांक सेलच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नगरमध्ये रविवारी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यादरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यांनी स्वतःला हिंदू समाजाचा “गब्बर” असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचे विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त भाषणावरून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अल्पसंख्यांक सेलच्या वतीने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून, नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राणे यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. वादग्रस्त भाषणातील अनेक वक्तव्यांमुळे समाजात धर्मनिरपेक्षतेचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, भाजपच्या या भडकावू प्रवृत्तीमुळे राज्यात सांप्रदायिक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना सोहैल रज़ा शेख, नरेंद्र बोबडे, प्रवीण पडवेकर, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सैयद रमजान अली, मनीष तिवारी, बालचंद्र दानव, पप्पू सिद्धिकी, पिंटू सिरवार, सागर खोबरागडे, सलीम शेख, रामकृष्ण कुंद्रा, राजीव खजांची, नौशाद शेख, सुल्तान शेख, अल्ताफ अली, मौलाना कारी वकील साब आणि नईम भाई यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये