Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे  जागतिक युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी मंचावर महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. शारदा शाक्य, चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट अधिकारी निरंजन मंगरूळकर,समुपदेशक एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय गडचांदूरच्या आसमा पठाण,अशोक शिंदे, रूपाली मडावी, संकल्प बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, प्रा. गजानन राऊत, प्रा. सचिन यनगंदलवार रासेयो अधिकारी उपस्थित होते.

          निरंजन मंगरुळकर यांनी मार्गदर्शन करताना एड्स या रोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि या रोगापासून बचाव करण्याकरीता कोणती दक्षता घ्यावी याबद्दल सांगितले. प्रा. गजानन राऊत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी तारुण्यात पदार्पण केल्यानंतर नकळत काही चुका झाल्या असल्यास वैद्यकीय तपासणी करून भविष्यातील धोका टाळावा असे सांगितले.  प्रा. सचिन यनगंदलवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात एड्स रोग होण्याची कारणे सांगितले. संचालन प्रा. अमित बोरकर यांनी तर आभार प्रा. सचिन शिंदे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये