Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांती ज्योत यात्रा गडचांदूरात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांती ज्योत यात्रा गुरूकुंज मोझरी येथून निघालेली यात्रा गडचांदूरात आली महात्मा गांधी विध्यालयाच्या पटांगणात झालेल्या कार्यक्रमात क्रांती ज्योत यात्रा प्रमुख सुशिल बुरडे,जिल्हा सेवाधिकारी प्रा अशोक चरडे, प्रांत सेवाधिकरी विठ्ठलराव सावरकर, प्रा रुपलाल कावळे, गावत्रे महाराज, विजय चिताडे,दिपक महाराज, सेवानिवृत्त प्राचार्या स्मिताताई चिताडे,प्राचार्य साईनाथ मेश्राम, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, किनाके महाराज,ढवस महाराज,बापूजी पिंपळ कर,तानाजी बुराण, विठ्ठलराव मुसळे, पावडे गुरुजी, पांडू कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. अशोक चरडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला सर्वप्रथम या यात्रेचे स्वागत सेवानिवृत्त प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे व प्राचार्य साईनाथ मेश्राम व महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने केले व गुरूदेव सेवा महिला भजन मंडळीने केले गावातील मुख्य रस्त्याने वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराज यांची पालखी काढण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले या कार्यक्रमासाठी गरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व महात्मा गांधी विध्यालयाचे शिक्षक व विध्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये