Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालक आणि शिक्षक हे मुलांच्या आनंदी शिक्षणाचे रहस्य : रवींद्र मुप्पावार

विश्वशांती विद्यालयात पालक सभेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

पालक आणि शिक्षक यांच्यातील विश्वास आणि परस्पर समज हे मुलांच्या आनंदी शिक्षणाचे खरे रहस्य आहे.पालकांकडून शिक्षकाप्रती

असलेला पाठिंबा आणि सहकार्य मुलांशी जोडण्यास ,समजून घेण्यास आणि कार्य करण्यास खूप मदत करते.पालक आणि शिक्षक यांनी समजून घेऊन कार्य केल्यास मुलांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो.चांगले पालक व शिक्षक नातेसंबंध मुलाला शाळेत जाण्यासाठी सकारात्मक बनवितात असे विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी पालक सभेला मार्गदर्शन केले.

भारत प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे आयोजित पालक सभेमध्ये शिक्षक पालक संघ, माता पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती,सखी सावित्री समिती,इत्यादी समित्या गठित करण्यात आल्या.त्यात शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून कृष्णाजी राऊत तर माता पालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून सोनाली जक्कुलवार यांची निवड करण्यात आली.

सदर पालक सभेला सभाध्यक्ष म्हणून विलास आकुलवार प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,आकाश बुरीवार,सहाय्यक शिक्षक संजय ढवस,किशोर संगिडवार उपस्थित होते.पालक सभेचे संचालन सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी केले तर आभार उर्मिला बारेकर यांनी मानले.पालक सभेला बहुसंख्य पालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये